पाण्याचे विशेष मृदूकरण व खनिज निर्मुलन -२

Category: मराठी लेख Published: Sunday, 19 November 2017 Written by Super User
सार्वजनिक पाणी पुरवठयासाठी पाण्याचा कठीणपणा किती मर्यादेपर्यंत असावा हे तेथील लोकांच्या सवयी पाहून ठरवावे लागते. ज्यांच्या नेहमी मृदू पाणी वापरण्यासाठी सवय आहे त्या १०० भा/दलभा कठीणपणाही जास्त वाटेल उलट जे नेहमी कठीण पाणी वापरतात त्यांना एवढा कठीणपणा असलेले पाणी चालू शकते. पाणी ३० ते ५० भा/दलभा पेक्षा जास्त मृदू असल्यास ते संक्षारक असते. जर पाण्याचा कठीणपणा १५० भा/दलभा पेक्षा जास्त असतो त्या पाण्यासाठीच बहुधा मृदुकरण पद्धतीचा वापर केला जातो व पाण्याचा कठीणपणा सुमारे ८० भा/दलभा होईल एवढेच मृदूकरण येते.

मृदू पाणी व कठीण पाणी हे शब्द खालील संदर्भात वापरले जातात.

   मृदुपाणी:- पाण्याचा कठीणपणा ५० भा/दलभा पेक्षा कमी
   साधारण कठीण पाणी:- पाण्याचा कठीणपणा ५० ते १५० भा/दलभा चे दरम्यान
   कठीण पाणी:- पाण्याचा कठीणपणा १५० ते ३०० भा/दलभाचे दरम्यान
   फार कठीण पाणी:- पाण्याचा कठीणपणा ३०० भा/दलभा पेक्षा जास्त

मृदूपाण्यामुळे होणारे फायदे:-

घरांमध्ये मृदू पाणी उपल्ब्ध झाल्यास धुण्याची क्रिया चांगली होऊन, लागणाऱ्या साबणातही बरीच बचत होते. 
मृदू पाण्याच्या वापर केल्याने बाष्पक, उष्णक इत्यादींसाठी लागणाऱ्या इंधनात व व्यवस्थापन खर्चात जी बचत होते. त्याचा अंदाज करणे सोपे नसते. उद्योगधंद्यामध्ये वापरले जाणारे पाणी व बाष्पकास पुरविले जाणारे पाणी बहुधा व्यक्तिगत मालकी व्यवस्थापनात मृदू केले जाते. यावरून ही बचत किती मोठी असते हे कळून येते. 

 खनिज निर्मुलन पद्धती:- बहुधा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा फक्त पाण्याच्या मृदुकरणाशी संबंध येतो. पण वर उल्लेखलेल्या कारणांसाठी त्यांना आपला दृष्टीकोन व जुन्या पद्धतीचा आवश्यक असते. यात खालील पद्धतीचा समावेश होतो. 

१)  चुना व सोडा वापरून केलेले मृदूकरण :- यामध्ये पाण्यातील बहुतेक कॅलशियम व मॅग्नेशियम अविद्राव्य विक्षेपात रुपांतर होते व पाण्याची अल्कता कमी होते. 

२) आयन विनिमय करणाची पद्धत वापरून केलेले मृदूकरण किंवा खनिजनिर्मुलन 
आयन विनिमय होऊन खनिजनिर्मुलन यामध्ये धन ऋण दोन्ही प्रकारच्या आयन पाण्यातून वेगळे केले जातात. (म्हणजे कॅलशियम, मॅग्नेशियम, याबरोबरच कार्बोनेट क्लोराईड सल्फेट यांचेही निष्कासन होते. व पाण्यात अजिबात खनिजे नसलेले पाणी संक्षारक असते त्यामुळे पाण्यात थोडया प्रमाणावर खनिजे रहातील अशारितीने मृदू केले जाते.) 

३) विद्युतपारगमन :- या पद्धतीत प्रक्रिया करावयाच्या निरनिराळ्या पाण्यात योग्य त्या प्रकारचे पडदे तयार केलेले असतात व पाण्यातून दिशानिष्ठ विद्युतप्रवाह सोडला की यामुळे आयन पडद्यातून पलीकडे जातात व योग्य त्या कप्प्यांमध्ये खनिज निर्मुलन झालेले पाणी रहाते.

४) ऊर्ध्वपातन:- या पद्धतीत खऱ्या पाण्याचे वा समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन केले की खनिज नसलेले ऊर्ध्वपतीत पाणी तयार होते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन केले जाते सूर्य शक्तीवरील अशा ऊर्ध्व पातनाचाही पद्धतीत समावेश होतो. 

५) प्रशीतन करणे:- यामध्ये खऱ्या पाण्याचे प्रशीतन केले जाते व तयार झालेले गोड्या पाण्याच्या बर्फाचे स्फटिक त्यातून वेगळे केले जातात. 
Pin It
Hits: 100